अमळनेर - राज्यभरात सुरू असलेल्या १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या निम्मिताने अमळनेर तालुक्यातील परीक्षा केंद्र येथे जाऊन परिक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, अमळनेर व माजी मत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या तर्फे पेन व पुष्पगुच्छ देत परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.!
या वेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मा.अध्यक्ष सनी गायकवाड, दर्शन पाटील, शहराध्यक्ष कृष्णा बोरसे,सायली बडगुजर,जनार्दन पाटील, मयूर बोरसे,शुभम गोसावी, खुशाल पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते..
लोक न्यूज