लोक न्यूज
स्व. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उद्या पत्रकार संघात साजरी होणार...
मराठी पत्रकार परिषद मुंबई, यांच्या आवाहनानुसार
जळगाव जिल्हा पत्रकार संघ तर्फे स्व. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती 20 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार संघात जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधव भगिनी सोबत साजरी होणार आहे.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विजय बापू पाटील व महनीय वक्ते म्हणुन श्री युवराज पाटील जिल्हा माहिती अधिकारी तसेच श्री संदीप घोरपडे अमळनेर हे राहणार आहेत. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन खा. श्रीमती स्मिता ताई वाघ, आ. श्री राजु मामा भोळे हे उपस्थित राहणार आहेत. हे कार्यक्रम हीरक महोत्सवी वर्ष अंतर्गत होत असून जिल्ह्यातील सर्व तालुका प्रमुख व पत्रकार यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन नरेंद्र नेहेते, अशोक भाटिया, लेखराज उपाध्याय, प्रमोद पाटील , भिका चौधरी, विवेक खडसे, दिलीप शिरूडे, मुकुंद एडके, पांडुरंग महाले,  सारंग भाटिया आदींनी केले आहे.

२० फेब्रुवारी ला मा. विजय बापू पाटील यांचा वाढदिवस सुध्दा आहे. आपण सर्व पत्रकारांचा आनंद द्विगुणित करणारा हा सुखद प्रसंग असेल. सर्वांनी आवर्जून यावे. असे आवाहन प्रमोद अण्णा पाटील,अध्यक्ष जळगाव जिल्हा पत्रकार संघ.यांनी केले आहे.