अमळनेर : शासनाने २६ नोव्हेंबर २०२४ ते २६ नोव्हेंबर २०२५ दरम्यान हर घर संविधान अभियान राबवणे सुरू केले असले तरी सामाजिक कार्यकर्ते प्रा अशोक पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून “संविधान जागर अभियान” अंतर्गत दररोज संविधानाच्या एक एक मुद्यावर प्रकाश पाडणे सुरू केले आहे.
२६ जानेवारी २०२५ पासून प्रा पवार यांनी या अभियानाला सुरूवात केली आहे. राष्ट्रध्वज ,राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यांची निवड कशी झाली ,कधीपासून अमलात आणले गेले , पूर्वीच्या इंडियाचा अधिकृत भारत कसा झाला. १७ सप्टेंबर १९४९ च्या संविधान सभेत इंडिया दॅट इज भारत असे निश्चित करून दोन्ही नावाना मंजुरी देण्यात आली. त्याच प्रमाणे भारतीय संविधानाचे जगातले स्थान आणि महत्व ,कितीवेळा दुरुस्ती करण्यात आली. अर्थसंकल्प कसा मांडला जातो , अर्थसंकल्प ,नवीन करप्रणाली राष्ट्रपतींच्या मंजुरीने लोकसभा व राज्यसभेत मांडले जाते. राज्यसभेला नाकारण्याचे अधिकार नाहीत दुरुस्ती सुचवण्याचे अधिकार आहेत. लोकसभेला सर्व अधिकार आहेत. अशा अनेक पैलूंवर प्रा अशोक पवार दररोज सोशल मीडियातून संविधान जागर करीत आहेत. त्यामुळे वाचणाऱ्या सर्वसामान्य माणसाला देखील संविधान ,अधिकार ,कायदे कळू लागले आहेत. आणि संविधानाबद्दल आदर निर्माण होऊन संविधानाचा सन्मान वाढत आहे. वाचकांनी प्रा अशोक पवार यांचे अभिनंदनही केले आहे.