अमळनेर : स्वतः पदवीधर असून परिस्थिती अभावी नोकरी मिळू शकली नाही ...म्हणून पदरी हमाली पडली.. वेळ पडली तर १२ तास जड काम नाहीतर चार पाच महिने काहीच नाही अशाही बिकट परिस्थितीत ते आपल्या मुलांसाठी भगवान ठरले अन हमालाची मुले एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी झाले.
शहरातील ताडेपुरा येथील भगवान देवचंद कंखरे हे कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाली काम करतात. मे नंतर ऑक्टोबर पर्यंत बाजार समितीत काम मिळत नाही. त्यावेळी भगवान गावोगावी सायकलवर फिरून बारदान गोळा करतात. व्यापाऱ्यांना विकून त्यात मिळालेल्या नफ्यातून घराचा उदरनिर्वाह करतात. सुरुवातीला १० बाय १० ची खोली त्यात पाच जण राहत होते. मोठ्या मुलीच्या लग्नात पाहुणे बघायला येत असताना मुलीला तयारी करायला जागा नसायची. या बिकट आणि अवघड परिस्थितीला बघून त्यांनी पुढच्या दोन्ही मुलांना असे घडवावे की त्यांना पैशासाठी नोकरीला अडचण येऊ नये. अशा बिकट परिस्थिती तुन बाहेर पडण्यासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग,असल्याचे त्यांनी ओळखले,,
व त्या प्रमाणे मुलांना घडवले
रोहित कंखरे व शुभांगी कंखरे दोघेही भाऊ बहीण एकाच वेळी दोघेही एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेत
शुभांगी कंखरे या परीक्षेत राज्यात 18 व्या क्रमांकावर उत्तीर्ण झाली आहे. परिसरात दोघे भावंडे कौतुकाचा विषय झाला आहे.
धनगर समाज बांधवांनी त्यांचा सत्कार केला
धनगर समाजाच्या गरीब कुटुंबातून दोन्ही बहीण भाऊ परिस्थितीवर मात करत यशस्वी झाल्याने समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा चे उपाध्यक्ष, चंद्रकांत कंखरे
नवी मुंबई येथील एपीआय सुनील कंखरे, धनराज कंखरे, धनराज नाटू चिंचोरे,आसाराम देवचंद कंखरे,श्रावण दयाराम धनगर आदी उपस्थित होते.