लोक न्यूज
अमळनेर: येथील आधार बहुउद्देशीय संस्था तर्फे  स्वामिनी प्रकल्पांतर्गत ग्रामीण भागातील बचत गटातील गरजू महिलांसाठी व  महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी आणि त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी  १२ दिवसीय ऍडव्हान्स शिवणकाम  प्रशिक्षणात एकूण ११० महिलांनी यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले.
  प्रशिक्षणादरम्यान महिलांना ड्रेस, ब्लाऊज, कुर्ता, पंजाबी ड्रेस आणि विविध प्रकारच्या डिझाईन्स शिवण्याचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

प्रशिक्षण कार्यक्रमाची वैशिष्ट्ये:
महिलांसाठी मोफत प्रशिक्षण आणि तेथे लागणारे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. प्रशिक्षणानंतर महिलांना प्रमाणपत्र देऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रशिक्षणामुळे महिला घरबसल्या शिवणकाम व्यवसाय सुरू करू शकतील.
प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. महिलांना आर्थिक स्वावलंबनाची संधी या प्रशिक्षणामुळे मिळाली असून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत होणार आहे. प्रशिक्षक चैताली साळुंखे यांनी  प्रशिक्षण दिले. आधार संस्थेच्या अश्विनी सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले, तर कार्यक्रमाचे नियोजन उर्जिता शिसोदे आणि प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर मुरलीधर बिरारी यांनी केले.