लोक न्यूज

अमळनेर-महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या खांद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पक्ष संघटनेची मोठी जबाबदारी दिली असून राष्ट्रवादीचे वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली आहे.
       राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा सुनिल तटकरे यांनी ही नियुक्ती केली असून सोबतच जळगाव,धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्याचे संघटनेचे प्रभारी म्हणून देखील  जवाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.याबाबत 22 फेब्रुवारी रोजी प्रदेशाध्यक्ष यांचे पत्र आ पाटील यांना प्राप्त झाले आहे.
        दरम्यान या आधी देखील आ अनिल पाटील यांच्यावर जळगाव धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्याचे सदस्य नोंदणी प्रमुख म्हणून जवाबदारी देण्यात आली होती,ती जवाबदारी त्यांनी चांगल्या पद्धतीने सांभाळली होती,यावेळी आमदार पाटील यांचा मंत्री मंडळात समावेश न झाल्याने मात्र राज्य पातळीच्या नेत्यांमध्ये त्यांची तुलना होऊ लागल्याने निश्चितच त्यांच्यावर पक्ष संघटनेची मोठी जबाबदारी येईल अशी चर्चा सुरू होती अखेर पक्षाने खरोखरच प्रदेश पातळीवरची मोठी जवाबदारी देत सोबत तीन जिल्ह्यांचे प्रभारी पद दिल्याने अनिल पाटील यांची संघटनात्मक जवाबदारी वाढली आहे.
     सदर नियुक्ती बद्दल त्यांचे पक्ष प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,खासदार प्रफुल्ल पटेल,प्रदेशाध्यक्ष खा सुनिल तटकरे यासह जिल्हा व राज्यातील पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.