अमळनेर : प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका , मृदू स्वभाव आणि वेळ प्रसंगी आपल्या सेवेत अट्टल गुन्हेगाराचा एन्काऊंटर करण्यास मागे पुढे न पाहिलेला एक कर्तव्यदक्ष समाजाभिमुख अधिकारी पोलीस निरीक्षक विकास सुखदेव देवरे २८ फेब्रुवारी रोजी ३८ वर्षे १० महिने १७ दिवसांची दीर्घसेवा करून निवृत्त होत आहेत.
मालेगाव तालुक्यातील उमराणे गावचे मूळ रहिवासी असलेले विकास देवरे यांचे आई वडील शेतकरी होते. उमराणे येथे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतल्यानन्तर आई वडिलांना शेती कामात मदत करून मालेगाव येथे बी ए पर्यंत शिक्षण घेतले. १९८९ ला एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी आतापर्यंत घोटी ,नाशिक , नागपूर ,अहमदनगर , अकोला , जळगाव, अमळनेर आदि ठिकाणी आपली सेवा बजावली आहे.
अतिशय नम्र , शांत आणि सुस्वभावी व्यक्तिमत्व म्हणून विकास देवरे परिचित आहेत. संयम बाळगून समजोता करून वाद मिटवण्यासाठी त्यांचे सतत प्रयत्न असायचे मात्र चुकीला माफी नाही हे त्यांचे तत्व होते.
२१ मे १९९१ रोजी साईनाथ जंगलु आडोले हा अट्टल गुन्हेगार सातवा खून केल्यानन्तर सापडला होता. पी डी जाधव नावाच्या एसपी होत्या. गुन्हेगाराने नेमका पोलिसाचाच खून केला होता. खतरनाक गुन्हेगार म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोपी जिवंत किंवा मृत पकडा असे फर्मान काढले होते. पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी आरोपीला जिवंत पकडले होते. त्याला कसारा घाटातून नेत असताना शहापूर तालुक्यातील उमरावणे शिवारात त्याने ऍटॅक करण्याचा प्रयत्न केला असता जराही न घाबरता पोलीस अधिकारी देवरे यांनी सरळ एन्काऊंटर करून खतरनाक गुन्हेगार संपवला होता.
एव्हढेच नव्हे तर कोपरगाव येथील कोल्हे आणि काळे यांच्यातील राजकीय वैर सर्वांना माहीत आहे. एकाच ठिकाणी दोन दहीहंडी फोडण्यावरून वाद होते. वाद विकोपाला जाणार होते. मात्र काही अनर्थ घडण्याच्या आधी विकास देवरे यांनी चातुर्याने परिस्थिती हाताळली. दोघांना पटेल असा पर्ययी मार्ग शोधला दोघा गटांची समजूत काढून दोन वेगवेगळ्या जागेवर दहीहंडीला परवानगी दिली. आणि आजही शांततेने ती परंपरा चालू आहे.
२०२१ मध्ये त्रिपुरा मध्ये महंमद पैगंबर यांच्यावरून दंगल पेटली होती. मालेगाव मध्ये २५ हजाराचा मोर्चा निघाला होता. दगडफेक सुरू होती. नागरिकांसह पोलिसांचा देखील जीव धोक्यात होता. त्याचदिवशी एस टी चा संप सुरू होता. २० ते २५ कर्मचारी संपावर उतरले होते. विशेष म्हणजे चाहुबाजूने वस्ती मुस्लिम आणि संपावर गेलेले कर्मचारी हिंदू होते. जिथे स्वतःचा जीव वाचवायची पडली होती तिथे विकास देवरे यांनी त्या २०-२५ जणांना सुखरूप बाहेर काढले आणि त्यांनतर जमाव नियंत्रणात आणण्यासाठी फायर देखील झाला होता. नागपूर येथील संघ इमारतीवर हल्ला झाला तेव्हा देखील विकास देवरे यांनी व्यवस्थित पणे प्रश्न हाताळला होता. कोणत्याही कठीण प्रसंगाला न घाबरता संयमाने प्रकरण हाताळणारा देवमाणूस विकास देवरे आज खाकी च्या सेवेतून निवृत्त होत आहे. अमळनेरातील त्यांचा अल्पवधीचा काळ निश्चितपणे समरणात राहणारा असेल.