अमळनेर : शहरातील गांधलीपुरा भागात वेश्या व्यवसाय बंद करण्याच्या याचिकेवरून तसेच हप्ते वसुली करण्याच्या कारणावरून दोन गटात मारहाण २५ रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास मारहाण झाली असून एकमेकांविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आकिब अली सैय्यद यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, २५ रोजी रात्री ते त्यांच्या मित्रासोबत पाचकंदील चौकात उभे असताना माजी नगरसेवक सलीम शेख चिरागोद्दीन ऊर्फ सलीम टोपी,इम्रान शेख,रिजवान शेख,कादिर अली सैय्यद,अयाज शेख हे तिथे आले व त्यांनी मला शिवीगाळ करायला सुरवात केली.तसेच माझ्या काकांनी वेश्या व्यवसाय बंद करण्याची टाकलेली याचिका मागे घेण्याची मला धमकी दिली.माझे हप्ते बंद करण्यासाठी ही याचिका टाकल्याचे सलीम टोपी यांनी यावेळी म्हटले व सर्वांनी मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.एवढ्यावरच न थांबता ते रात्री ११ वाजता माझ्या घरी आले व त्यांनी माझ्या आई व काकूला शिवीगाळ केली तसेच हातपाय तोडून टाकण्याची धमकी दिली असून आकिब अली सैय्यद यांच्या फिर्यादीवरून ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
दुसऱ्या गटाकडून नाजमीन शेख अशपाक हिने फिर्यादीत म्हटले आहे की,२५ रोजी रात्री १०.३० वाजता सासू, दीराणी यांच्यासोबत घरात काम करत असताना यावेळी कुदरत अली,आकिब अली, दानिश अली,फिरोजशेख, युसुफअली,रियाज मौलाना हे आमच्या घरासमोर आले यापैकी काही जण घरात घुसून आम्हाला शिवीगाळ करू लागले तसेच तुमचे सासरे सलीम टोपी हे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांकडून हप्ते घेतात असे सांगितले तसेच शिवीगाळ करू लागले,आम्ही आरडाओरडा केल्याने ते सर्व जण पळून गेले.नंतर त्या सर्व जणांनी सलीम टोपी यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना मारहाण केली. नाजमीन शेख यांच्या फिर्यादीवरून ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय राजु जाधव करीत आहेत.