अमळनेर : तालुक्यातील मराठा समाज महिला मंडळाने शिवजयंतीनिमित्त शिंदखेडराजा येथे ऐतिहासिक सहल काढली.
19 रोजी माॅसाहेबांच्या (जिजाऊंच्या) वेशात ६० महिला जिजाऊ वंदना म्हणून व दिवे पेटवून सहलीला रवाना झाल्या. सिंदखेडराजाला गेल्यावर लखुजीराव जाधव यांच्या वाड्याचे दर्शन घेऊन धान्य कोठार, तळघर ,न्यायदानाची जागा व जिजाऊ जन्मस्थळ याची माहिती जाणून घेतली. तेथून लखुजीराव जाधव व त्यांची तीन मुले ,नातू ,अंगरक्षक यांच्या समाधीचे नितांत श्रद्धेने दर्शन घेतले. तसेच जगदीश्वराचे मंदिराचेही दर्शन घेतले नंतर जिजाऊ सृष्टीला भेट दिली. मासाहेब जिजाऊंच्या मूर्तीला सगळ्यांनी त्रिवार वंदन केले . परतीच्या प्रवासात रस्त्यात जाईचा देव हे महानुभाव पंथाचे पवित्र तीर्थक्षेत्राला भेट दिली. या सहलीसाठी मराठा समाजाच्या अध्यक्षा तिलोत्तमा पाटील, जयश्री पाटील ,पद्मजा पाटील , लीना पाटील, शीला पाटील ,भारती पाटील, अलका विनोद पाटील, रागिणी पाटील, प्रभा पवार व सुनिता पाटील यांनी परिश्रम घेतले.