लोक न्यूज
अमळनेर: महाराष्ट्र राज्याचे माजी मदत व पुनर्वसन (आपत्ती व्यवस्थापन) मंत्री  तथा अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान  आमदार अनिल भाईदास पाटील यांनी राज्य शासनातर्फे  पुरविण्यात आलेली वाय प्लस दर्जाची सुरक्षा स्वतःहून नाकारली असून याबाबत दिनांक 11 फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांना लेखी पत्र देत सदर सुरक्षा काढण्याची विनंती केली आहे._
       सदर सुरक्षेची आपणास आता आवश्यकता नसल्याने ती काढून टाकण्यात यावी अशी विनंती त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना केली आहे.दरम्यान गेल्या टर्म मध्ये आमदार अनिल पाटील हे महाराष्ट्र शासनाच्या कॅबिनेट मंत्री पदी विराजमान झाल्यानंतर त्यांना राज्य शासनाकडून वाय प्लस दर्जाची पोलीस सुरक्षा देण्यात आली होती,यात एक पोलीस व्हॅन व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता.दोन महिन्यांपूर्वी विधानसभा बरखास्त झाल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनिल पाटील पुन्हा अमळनेर मतदारसंघात आमदार म्हणून विजयी झालेत.मात्र नव्या मंत्री मंडळात त्यांचा समावेश होऊ शकला नव्हता.अश्या परिस्थितीत देखील राज्य शासनाने त्यांना पुरविण्यात आलेली वाय प्लस सुरक्षा न काढता जैसे थे ठेवल्याने ही सुरक्षा त्यांच्या सोबत आजपर्यंत कायम होती.अखेर अनिल पाटील यांनी स्वतःहून ही सुरक्षा नाकारण्याचा निर्णय घेत.सुरक्षा काढण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र दिले आहे