अमळनेर : ट्रॅक्टर चा विमा भरायला पैसे नाहीत म्हणून ट्रॅक्टर चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्याचा रेटा लावणाऱ्या ठकाचा प्रयत्न पोलिसांनी उलट तपासणीत हाणून पाडल्याने शेवटी पोलिस पोलिसच राहतात याची प्रचिती त्याला आली.
तालुक्यातील झाडी येथील एकाचे ट्रॅक्टर हप्ते थकले होते. विमा मुदत संपायला अवघे चार पाच दिवस बाकी होते. त्याने शक्कल लढवली ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा दाखल करायचा आणि विम्यात फायदा करून घ्यायचा. पठ्ठ्याने कहाणी रचली ... गलवाडे रस्त्यावर जात असताना जेवायला गेलो...नन्तर हॉटेलच्या मागे मोकळ्या जागेत शौचास गेलो ...परत आलो तर ट्रॅक्टर गायब ...ठाणे अंमलदार विनोद सोनवणे यांच्यासमोर तक्रार द्यायला उभा राहिला अन त्याने पुरावा म्हणून हॉटेलचे बिल ही सादर केले. तिथेच विनोद सोनवणे याना शंकेची पाल चुकचुकली ...त्यांनी फिर्यादीला विचारले खरे सांग ...तो अजिबात ऐकायला तयार नव्हता अवघ्या चार पाच किमी अंतरावर गाव असताना ट्रॅक्टर मालक शेतकरी हॉटेल मध्ये जेवतो आणि आवर्जून सोबत बिलही आणतो तसेच हॉटेल मध्ये शौचालय असते तरी हा बहाद्दर बाहेर मोकळ्या जागेत गेल्याचे सांगतो....काही तरी गडबड म्हणून हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे यांनी उलट तपासणी सुरू केली. पोलीस गणेश पाटील यांना फिर्यादीला घेऊन जाऊन तो जिथे शौचास बसला होता तिथून त्याच्या नमुना आणा म्हणून पाठवले. पोलिस आपल्याला खरेच तेथे नेणार नाहीत म्हणून मोठ्या धाडसाने गेला. इकडे शोध तिकडे शोध परंतु शौचास बसलेली जागाही सापडली नाही आणि ना काही पाण्याची चिन्हे सापडली. ठकाला आपली लबाडी उघडी पडल्याचे लक्षात आले अन तो फिर्याद द्यायला आलाच नाही.
पोलिसांच्या सतर्कतेने विम्याची खोटी रक्कम हडपण्याचा प्रयत्न फसला. त्याला खडसावून विचारले की खरे सांग ट्रॅक्टर कुठे आहे. तो लगेच पोपटासारखा बोलू लागला .. मला माझ्या मित्राने सांगितले की तुझ्या ट्रॅक्टरसारखे एक ट्रॅक्टर बहदरपूर जवळ आढळून आले आहे तिथे बघतो. ते त्याचेच ट्रॅक्टर होते त्यानेच लपवून ठेवल्याची पोलिसांना खात्री झाली. सतर्कतेने खोटा गुन्हा दाखल झाला नाही अन पोलिसांचा वेळही वाचला.