अमळनेर : निम्न तापी प्रकल्प पाडळसरे चा निधी खेडी भोकरी पुलाला देऊ नये त्यासाठी स्वतंत्र निधी देण्यात यावा अन्यथा पाडळसरे धरण जनआंदोलन समिती तर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
खेडी भोकरी पुलासाठी १५० कोटी रुपये तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात मंजूर करण्यात आले होते. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ७५ कोटी व निम्न तापी प्रकल्प पाडळसरेच्या निधीतून ७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. निम्न तापी प्रकल्पातून १५ कोटी रुपये आधीच देण्यात आले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून निम्न तापी प्रकल्प रखडलेला आहे. दरवर्षी निधी मिळण्यासाठी मर्यादा येत असल्याने प्रकल्पाचे काम धिम्या गतीने सुरू आहे. यामुळे प्रकल्पाची किंमत दरवर्षी वाढत जात आहे. निधी इतरत्र वळवल्यास प्रकल्पाच्या कामावर परिणाम होतील. निधी अभावी काम लवकर थांबेल. त्यामुळे तालुक्याच्या प्रगतीत बाधा निर्माण होईल. त्याचप्रमाणे पाडळसरेचा निधी इतरत्र खर्च झाल्यास लाभ व्येय गुणोत्तर कमी होईल. दरवर्षी साधारणतः १०० कोटींच्या आसपास निधी मिळाला आहे. आणि निधी पुलाला दिल्यास धरण कसे होणार? प्रकल्पाच्या नदी पात्रातील गेट चे काम सुरू आहे , उपसा सिंचन योजनांचे पाईप लाईन टाकण्यात येत आहे. भूसंपादनाची प्रक्रिया अपूर्ण आहे. निधी पुलाला वळता केल्यास समिती तर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर जनआंदोलन समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी , रणजित शिंदे , महेश पाटील , हेमंत भांडारकर , सुनील पाटील ,रामराव पवार , सुशील भोईटे आदींच्या सह्या आहेत.
तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक तसेच मुख्य अभियंता तापी पाटबंधारे विकास महामंडळ याना देखील निवेदन देण्यात आले आहे.
खेडी भोकरी पुलाचे काम ३० ते ३५ कोटी रुपयांपर्यंत झाले असल्याचे समजते. या प्रकल्पाला बांधकाम विभागाकडून पुरेसा निधी अजून प्राप्त झालेला नसल्याचे समजते.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत प्रकल्पाचा समावेश होण्यासाठी प्रकल्पावर किमान ४० टक्के खर्च होणे आवश्यक असल्याने राज्यसरकारकडून निधीची तशी तरतूद करून घेतली आहे. त्यामुळे निधी वळता केल्यास तांत्रिक अडचणी निर्माण होऊन प्रकल्पाची गती मंदावेल. म्हणून खेडी भोकरी पुलास स्वतंत्र निधी बांधकाम विभागाकडून देण्यात यावा.- अनिल भाईदास पाटील , माजी मंत्री मदत व पुनर्वसन*