अमळनेर : आपल्या आईवडिलांसोबत जाणाऱ्या तरुणीलाच प्रेमाची चिट्ठी देणाऱ्या तरुणाला दोघा मायलेकिनी चांगलाच प्रसाद दिल्याची घटना शिवाजी बगीच्याजवळ १८ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.
मंगळवारी दुपारी एक तरुणी आपल्या आईवडीलांसोबत शिवाजी बगीच्याकडून जात होती. तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने अजबच धाडस केले. आई बाप सोबत असतांनाच बहाद्दरने तरुणीला चिट्ठी देण्याचा प्रयत्न केला अन घात झाला. मुलीच्या बापाला हे लक्षात आले अन मजनुने धूम ठोकली...चिडलेला बाप , आई , मुलगी त्याच्यामागे पळू लागले... मुलीने आजूबाजूच्या लोकांना आवाज दिला त्याला पकडा....दोघे तिघे मोटरसायकलवर पळाले....त्याला पकडले माजी नगरसेवक प्रताप शिंपी आणि जीवन पवार यांनी त्या तरुणाला समजावत पोस्ट ऑफिस कार्यालयात आणले. संतप्त माय लेकींनी चपला काढल्या आणि मजनुवर चांगलीच हात सफाई केली. उपस्थित नागरिकानी त्याची चौकशी केली असता त्याचे वडील मयत असून तो मामाकडे वावडे येथे राहत असल्याचे समजले. अखेरीस जेष्ठ लोकांनी त्या तरुणाला तरुणीची माफी मागायला लावून दोघांची समजूत घालून वाद मिटवण्यात आला. यावेळी नरेश कांबळे यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक देखील हजर होते.