लोक न्यूज

मा.मंत्री तथा आमदार दादासो श्री. अनिल भाईदास पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या "वरिष्ठ उपाध्यक्ष" पदी नियुक्ती झाल्याबद्दल तसेच जळगाव, नंदुरबार व धुळे जिल्ह्यांच्या पक्ष संघटनेच्या प्रभारी पदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय अमळनेर येथे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी घोषणा देत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

त्याप्रसंगी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे, सोनू पाटील, योगेश पाटील, प्रदीप पाटील, सागर पाटील, निनाद शिसोदे, सागर पाटील, निलेश देशमुख, अमोल पाटील, राहुल गोत्राळ, योगेश पाटील, विपुल पाटील, वाल्मिक पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते..!