लोक न्यूज
अमळनेर : दिल्ली येथे होणारे ९८ वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जवखेडे येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका व खान्देश साहित्य संघ महाराष्ट्र राज्य शाखा - अमळनेर च्या तालुकाध्यक्षा कवयित्री सुनीता रत्नाकर पाटील यांना आपली ' मंतरलेली वाट'' ही कविता सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.२१ ते २३ फेब्रुवारी या दरम्यान हे कवी संमेलन दिल्ली येथे होणार आहे. सुनीता पाटील यांनी यापूर्वी त्यांचा 'रेवती एक काव्य परिमळ' हे काव्य संग्रह प्रकाशित केला आहेत. तसेच एक अहिराणी व एक बाल कविता संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. अनेक कवी संमेलनात निमंत्रित कवी म्हणून त्यांनी आपले काव्य सादर केली आहेत. ९४ वे आखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिक, ९६ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन वर्धा,९७ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन,अमळनेर येथे खान्देशी कवी संमेलनात निमंत्रीत कवी म्हणून कविता सादर केली आहे. तसेच ६ वे व ७ वे आखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनात त्यांनी आपल्या कविता सादर केल्या आहेत. वर्धा येथील साहित्य संमेलनातील ९६ निवडक कवितांचा कवितासंग्रहात त्यांच्या 'अर्थच चुकलाय स्वातंत्र्याचा' चा कवितेने स्थान मिळवले आहे.पुणे आकाशवाणी वरती त्यांच्या नियमित अलक लेखन सादर झाले आहे. त्याच्या या निवडीबद्दल परिसरातील व तालुक्यातील कवी ,लेखक व साहित्यप्रेमी यांच्या कडून अभिनंदन केले जात आहे.