अमळनेर : ढेकूरोडवर डांबरीकरण अपूर्ण झाले असल्याने रस्त्यावर टाकलेली कचखडीचे प्रमाण दोन्ही बाजूला आजूबाजूला जास्त असल्याने कच ठरत आहे. यामुळे ही कचखडी अपघाती झाली असून वाहनचालक स्लिप होण्याने त्रस्त आहेत.
आधी जुना डांबरी रस्ता होता. मात्र भुयारी गटाराचे काम सुरू झाले. त्यांनी गटार झाल्यावर काम अर्धवट सोडून गेले. धड रस्ता केला नाही किंबहुना खडी टाकून कच्चा सुद्धा तयार केला नाही. अखेर बांधकाम विभागाने ठेकेदाराला सांगून दोन महिने धुळीने ग्रस्त असलेल्या रस्ता नागरिकांची ओरड आल्यावर डांबरीकरण एक थर केला. पण ते देखील अर्धे अपूर्ण त्यावर पडलेली कच जशीच्या तशी सोडून ठेकेदार देखील मोकळा झाला.
वाहनांची वर्दळ नेहमी सुरू असल्याने कच अलगद उडून साईड पट्ट्यावर चर झाला प्रमाण जास्त असल्याने यामुळे गल्ली बोळात वळण घेतांना छोटी वाहने मोटार सायकल स्कुटी अशा वाहनांना जीवघेणे ठरत आहे. दररोज २ ते ३ जण स्लिप होतात यामुळे नागरिक वैतागले आहेत. साधी कच सुद्धा ठेकेदाराणे गोळा करण्याची तसदी घेतली नाही. आधी पासूनच हा रस्ता विविध कारणांनी गाजत आहे.
सिमेंट रस्ता कधी होणार
हा रस्ता थेट ओमशांती अपार्टमेंट ते नाल्यापर्यंत सिमेंट रस्ता मंजूर झाला आहे. मात्र सिमेंट रस्ता करण्याचे अद्याप पेंडिंग आहे. नागरिक कधी होईल सिमेंट रोड या प्रतीक्षेत आहेत. मात्र ठेकेदाराचे ८० फुटी रस्त्याचे काम घेतल्याने संबंधित रस्त्याकडे पाठ फिरवली आहे.
७ गावांची नियमित वाहतूक
तालुक्यातील पांझरा काठापासून मांडळ, वावडे, तळवाडे, शिरसाळे बु, शिरसाळे खु. ढेकू ग्रुप, आटाळे, पिंपळे बु , पिंपळे खु. अशा गावांचे नागरिक कामानिमित्त ये जा करतात तर सोनगीर जि.धुळे कडून अनेक वाहने याच रस्त्याने येतात जातात. त्यामुळे छोट्या वाहनधारकांच्या जीवाशी खेळ आहे. ही कच लवकरात लवकर गोळा करण्याची मागणी होत आहे.
याबाबत ठेकेदाराला कळवले आहे. लवरकच ही गोळा करण्याचे सांगून लवकरच सिमेंट रस्ता तयार करण्यासाठी सार्वजनिक विभाग ठेकेदाराला आदेशीत करणार आहे.- भागवत माळी, शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग.
अनेक वाहने या कचखडी मुळे घसरत आहेत. आम्ही दररोज पाहतो. सार्वजनिक बांधकाम विभाग याच रस्त्याला आहे.अधिकाऱयांना जा ये करतांना ही बाब नजरेत पडत नसेल तर हे जनतेचे दुर्दैव आहे. - डॉ उमेश सोनवणे. नागरीक.