लोक news-

अमळनेर - माझ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मला जे काही यश मिळालं ते संपूर्ण श्रेय हे संपूर्ण माझ्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे असून  पक्षाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक स्वतःची समजून जे काही अतोनात प्रयत्न केले त्या माध्यमातून मला हे यश प्राप्त झाले आहे.तसेच आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी आपल्याला जिल्ह्यात जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करायची असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा आ.अनिल भाईदास पाटील यांनी केले.
       अमळनेर येथे जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान पार पडले.याप्रसंगी आमदार पाटील बोलत होते,या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ दिनांक 7 फेब्रुवारी रोजी अमळनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय येथे करण्यात आला. या कार्यक्रमास युवा वर्गाचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य होण्याची इच्छा असलेल्या अनेक नागरिकांनी सदस्य नोंदणी केली.यावेळी आमदार पाटील यांनी आपल्या महायुती सरकारच्या ज्या काही नवनवीन योजना असतील त्या योजनाची माहिती आपण घरोघरी जाऊन त्यांचा प्रचार,प्रसार करून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करायची असल्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
       जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की जळगाव जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले एकमेव आमदार अनिल दादा निवडून आलेले आहेत म्हणून आपल्याला आपला पक्ष जास्तीत जास्त सदस्य वाढवून आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये आपले जास्तीत जास्त लोक निवडून येतील यासाठी सर्वांनी आज पासून प्रामाणिक प्रयत्न करून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करायची आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सदस्य नोंदणी अमळनेर तालुक्यातून झाली पाहिजे असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले, जिल्हाध्यक्ष म्हणून कधीही माझ्याकडे काही समस्या असेल तर कधी सांगा त्या सोडवण्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी असेल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
       राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्य नोंदणीसाठी हजार सदस्यांच्या वर नोंदणी करायचा मनोदय ज्यांनी व्यक्त केला अशा सर्वांचा सत्कार आमदार व जिल्हाध्यक्षांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.
या प्रसंगी  माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, राष्ट्रवादी प्रदेश सदस्य शिवाजीराव पाटील, प्रा.सुरेश पाटील, अनिल शिसोदे, कार्याध्यक्ष विनोद कदम, मार्केट सभापती अशोक पाटील, संचालक भोजमल पाटील, अशोक हिंमत पाटील, विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे व्यासपीठ वर उपस्थित होते.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पक्षाचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष, विधानसभा क्षेत्र प्रमुख, सर्व सेलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांच्या सहभागातून हे सदस्य नोंदणी अभियान यशस्वीरीत्या पार पडले.