अमळनेर : परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर वेळेचे नियोजन करा. २४ तासाचे वेळापत्रक ठरवा आणि त्याची काटेकोर अमलबाजवणी करा असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी जी एस हायस्कूल मध्ये इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांशी “परीक्षा पे चर्चा” करताना केले.
एका कार्यक्रमानिमित्त जी एस हायस्कूल मध्ये आले असता आमदार पाटील यांनी दहावीच्या मुलांची विचारपूस केली. अंतर्गत व लेखी गुणांची माहिती जाणून घेतली. दररोज किती तास अभ्यास करतात. कॉपी करू नका कॉपी करणे म्हणजे आपल्या आयुष्यात आपणच आपल्याला फसवणे होय. वेळे चे वेळापत्रक तयार करा भले तुम्ही त्यात किती वेळ नास्ता ,जेवण , आराम ,झोप ,खेळ ,गप्पा आदी गोष्टी करत असाल त्याचीही आखणी करा म्हणजे अभ्यासाला वेळ काढता येतो अन्यथा आपल्याला अभ्यासाला वेळ मिळाला नाही म्हणून हिरमुसले होतो. परीक्षेत यशस्वी होण्यासाठी प्लॅनिंग महत्वाचे आहे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी गटविकास अधिकारी एन आर पाटील , गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील ,कक्ष अधिकारी कैलास पाटील ,केंद्र प्रमुख शरद सोनवणे , मुख्याध्यापक बी एस पाटील, आर जे पाटील , संजय पाटील,सुनील वाघ हजर होते. मुलांनी आमदारांसोबत फोटोही काढले.