लोक न्यूज
अमळनेर: दिनांक १o फेब्रुवारी २०२५ रोजी प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी श्री विश्वकर्मा मंडळ मार्फत सामाजिक कार्य म्हणून जीवन श्री ब्लड बँक अंमळनेरच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरात अनेक समाज बांधवांनी रक्तदान केले.रक्त दात्यांना विश्वकर्मा मंडळाकडून वॉटर कूल बॉटल भेट देण्यात आली. तसेच विश्वकर्मा मंदिराच्या आवारात माजी मंत्री व आमदार दादासो.अनिल भाईदास पाटील यांच्या आमदार निधीतून बसविण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉक च्या कामाचे लोकार्पण आमदार साहेब अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.श्री विश्वकर्मा जयंतीच्या कार्यक्रमात मंदिराची डागडूजी,रंगरंगोटी टाईल्स बसविणे याकामी मदत देणाऱ्या अमळनेर शहर व तालुक्यातील देणगीदार सर्व समाज बांधव,रेऊ नगर,जिजाऊ नगर,वृन्दावन नगर या कॉलनीतील रहिवासी यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमला आमदार दादासो. अनिल पाटील,मा.जि.प.सदस्या जयश्री पाटील,मा.प्र.कुलगुरू शिवाजी पाटी ल,नगरसेवक गायत्री पाटील दिपक पाटील, राजूभाऊ फाफोरेकर,हिरालाल पाटील,महेन्द्र बोरसे ,जयेश काटे,काशिनाथ खैरनार, हरिओम बापु,श्री विश्वकर्मा मंडळ अध्यक्ष दिलीप जाधव,उपाध्यक्ष अनंत सूर्यवंशी,सचिव ज्ञानेश्वर मोरे,अरुण बोरसे,सुभाष देवरे ,विकास बोरसे,गोकुळ लोहार,अनिल देवरे,संदीप खैरनार डांगरकर,संजय मोरे ,संदीप खैरनार,वसंत सूर्यवंशी,अमित जगताप, महिला मंडळ अमळनेर सदस्य,जान्हवी बोरसे,रेखा मोरे,सुरेखा मोरे,कल्पना जाधव ,भारती जगताप ,शीतल खैरनार, वर्षा सूर्यवंशी, साधना शार्दूल,कविता सूर्यवंशी,
अनिता खैरनार, धनश्री खैरनार,मनीषा मिस्तरी,
जयश्री देवरे आदि उपस्थित होते.तसेच तालुक्यातील अनेक समाज बंधू बघिणी,कॉलनीतील रहिवासी उपस्थित होते.