लोक न्यूज
अमळनेर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पवित्र अस्थिकलश संदेशयात्रा १४ रोजी सायंकाळी अमळनेर शहरात दाखल झाली.यावेळीअनेकांनी कलशाचे दर्शन घेतले.भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संदेश भूमीचा प्रचार, प्रसार व्हावा म्हणून संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती तसेच धुळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संदेश भूमी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने त्यागमूर्ती रमाई आंबेडकर स्मारक (वरळी, मुंबई) ते चैत्यभूमी दादर (मुंबई) तसेच डॉ.बाबासाहेब संदेश भूमी (धुळे) अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा अमळनेर येथे सायंकाळी 6 वाजता चोपडा नाका येथे पोहोचली.यावेळी एबी ग्रुप तर्फे रथावर पुष्प उधळून स्वागत करण्यात आले.

     सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास चोपडा नाका येथे विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश
यात्रेचे आगमन झाले. तेथून ही यात्रा समाज बांधवांच्या उपस्थितीत फरशी रोड, बोद्ध विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर  चोक, गुड बाजार, बस स्थानक  मार्गे अत्यंत शांततेत रस्त्यावर फुलांची उधळण करत यात्रा साने गुरुजी शाळेच्या प्रांगणात अस्थिकलश ठेवून उपस्थितांनी दर्शन घेतले.याप्रसंगी जागतीक किर्तीचे ताडोबा अभयारण्यात राहणारे भन्ते महाथेरो ज्ञानज्योति यांनी उपस्थित जनसमुदायला धम्मादेसना दिली.

सदर पवित्र अस्थीकलश अभिवादन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे बाळासाहेब योगीराज संदानाशिव,अर्जुन संदानाशिव,किरण बहारे,कृष्णकांत शिरसाठ,आत्माराम अहिरे,प्रवीण बैसाने, सोमा कढरे,हरिभाऊ वाघ,डॉ विजय गाढे,एबी ग्रुपचे अरविंद बिर्हाडे,राहुल बिर्हाडे,विशाल सोनवणे,सौरव सोनवणे,राजरत्न रामराजे आदिंनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद निकम तर आभार प्रा डॉ विजय गाढे यांनी केले.
यावेळी अस्थिकलश यात्रेत सर्वच समाजातील मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.