लोक न्यूज
अमळनेर : आपला ताण कमी करण्यासाठी जसे आपण खेळ ,क्रीडा स्पर्धा आयोजित करतो त्याचप्रमाणे समाजाचा ताण दूर करण्यासाठी आदर्श नागरिक घडवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ज्ञानसंचय करा. समाजाचे आपण देणे लागतो याची जाणीव ठेवून जगात काय चालले आहे याची अद्ययावत माहिती मुलांना द्या असे आवाहन माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांनी जिल्हा परिषद  अधिकारी कर्मचारी तालुका क्रीडा स्पर्धांच्या बक्षिस वितरण प्रसंगी उपस्थित शिक्षक व कर्मचार्यांना केले.
   ८ रोजी जी एस हायस्कूल च्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी एन आर पाटील , बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता पी ए पाटील , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ  गिरीश गोसावी ,संजय पाटील , उमेश काटे , शरद सोनवणे ,चंद्रकांत साळुंखे ,रवींद्र पाटील ,राजेंद्र गवते , अशोक सोनवणे ,दिलीप सोनवणे , किरण शिसोदे ,ज्ञानेश्वर पाटील ,प्रवीण वाडीले हजर होते.
      यावेळी  रनिंग (पुरुष) विजेता - अजय  बोरसे (जि.प.उच्च प्राथ.शाळा खडके) ,उपविजेता - महेंद्र  पाटील (जि.प.उच्च प्राथ.शाळा रणाईचे) ,रनिंग (महिला) विजेता - दिपाली  पवार (जि.प.प्राथ.शाळा फापोरे बु.),उपविजेता - रोहिणी  पाटील  (जि.प.उच्च प्राथ.शाळा कलाली) ,*रस्सीखेच (पुरुष)
विजेता - बांधकाम विभाग
उपविजेता - फापोरे बीट (शिक्षण) ,रस्सीखेच (महिला) विजेता - अमळगाव बीट (शिक्षण) ,उपविजेता - फापोरे बीट (शिक्षण) ,*क्रिकेट (पुरुष) विजेता - बांधकाम विभाग ,उपविजेता - आरोग्य विभाग ,*बुध्दिबळ (पुरुष गट)* विजेता - दिपक  बोरसे (बांधकाम विभाग पं.स.अमळनेर) ,उपविजेता - संजय  महाजन (जि.प.प्राथ.शाळा गांधली) ,बुध्दिबळ (महिला गट) विजेता - पुनम पाटील (जि.प.उच्च प्राथ.शाळा खवशी) ,कॅरम (पुरुष गट)विजेता - प्रमोद  पाटील (गटसाधन केंद्र पं.स.अमळनेर) ,उपविजेता - सागर  नराल (प्राथ.आरोग्य केंद्र पातोंडा) ,बॅडमिंटन (पुरुष गट) विजेता - डॉ.गिरीष  गोसावी (आरोग्य विभाग पं.स.अमळनेर) ,उपविजेता - डॉ.अतुल  चौधरी (आरोग्य केंद्र शिरुड) ,*बॅडमिंटन (महिला गट)* विजेता - मोहिनी  पाटील (जि.प.उच्च प्राथ.शाळा निंभोरा) ,उपविजेता - आशा  महाजन (जि.प.प्राथ.शाळा सारबेटे) *सांस्कृतिक विभाग*
*गायन (पुरुष)* प्रथम - प्रविण  पाटील (जि.प.उच्च प्राथ.शाळा पिंगळवाडे) ,द्वितीय - सोमनाथ  विसपुते (जि.प.प्राथ.शाळा मंगरुळ) ,तृतिय - चंद्रकांत  पाटील (जि.प.प्राथ.शाळा शिरुड) *गायन (महिला)*
प्रथम - योगिता  साळुंखे (जि.प.प्राथ.शाळा शिरसाळे) ,द्वितीय -दिपाली  निकुंभ (जि.प.प्राथ.शाळा वाघोदा) *नृत्य (पुरुष)*
प्रथम - सुधीर  चौधरी (जि.प.प्राथ.शाळा तांदळी) ,द्वितीय- डॉ.कुणाल  पवार (जि.प.प्राथ.शाळा ढेकू खु) *नृत्य (महिला)*
एकल प्रथम - डॉ.पूजा  वाघुले (आरोग्य केंद्र गांधली)
समूह प्रथम - महिला मंच (शिक्षिका) ,*नाटिका (पुरुष)*
प्रथम - योगेश कापडणे (प्राथ.आरोग्य केंद्र मारवड) याना बक्षिस  देण्यात आले.
     तसेच *पंच / परिक्षक* म्हणून  कैलास  बाविस्कर ,संजय पाटील ,जयेश  मासरे ,जितेंद्र  बाविस्कर ,उमेश  काटे ,अतुल बोरसे ,योगेश  पाटील ,नितिन  शिंगाणे ,दिपक  सुरळकर ,मयूर  बारस्कर ,विवेक  अहिरे ,विशाल गावित ,विलास मोरे ,अरुण  मोरे ,गजानन  वाल्हे , *क्रीडा समन्वयक*
सुनिल  वाघ ,*स्पर्धा समन्वयक* दत्तात्रय  सोनवणे , डॉ.कुणाल  पवार यांचाही ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी तर आभार  शरद सोनवणे यांनी मानले.