जि.प.शाळा मंडळ बॉईज आणि गर्ल्स यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 6/2/25 गुरुवार रोजी शाळेत बाल आनंद मेळावा , महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम आणि महिलांचा संगीत खुर्ची आणि लिंबू चमचा स्पर्धा घेण्यात आल्या .
याप्रसंगी दोन्हीही शाळांचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री स्वप्निल नवल पाटील , श्री गुलाब कोळी आणि सदस्य उपस्थित होते . कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांच्या संगीत खुर्ची आणि लिंबू चमचा शर्यत स्पर्धा घेण्यात आल्या . विजेत्या महिलांना पारितोषिक देण्यात आले .
स्पर्धा नंतर महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला .
हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानंतर बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री स्वप्निलभाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी आणलेल्या भेळपुरी , बटाटेवडे , पोहे , भजी , लिंबू सरबत, कचोरी, खमंग ढोकळे, इडली, समोसे , आप्पे अशा अनेक स्वादिष्ट पदार्थांचा ग्रामस्थ शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला .
कार्यक्रमाचे संयोजन दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक श्री.रवींद्र संदानशिव, श्रीमती अलका पाटील मॅडम यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दोन्ही शाळांचे उपशिक्षक व उपशिक्षिका श्रीमती मंगला चव्हाण, श्रीमती संगीता पाटील, श्री जितेंद्र पाटील, श्री.राहुल सोनवणे, श्री अतुल खोडके, श्री यशोदीप पाटील, श्रीमती सुभद्रा कोळी मॅडम , गावातील सर्व अंगणवाडी सेविका यांनी प्रयत्न केले . कार्यक्रमास माननीय सरपंच श्रीमती मिनलताई कोळी आणि पोलीस पाटील श्रीमती शुभांगी ताई पाटील यांची उपस्थिती लाभली .
कार्यक्रमाच्या शेवटी सूत्रसंचालक श्री विकास पाटील सर यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाल्याचे जाहीर केले.