लोक न्यूज
दि.15/02/2025 रोजी जि.प.प्राथमिक शाळा मांडळ boys आणि Girls ता.अमळनेर या दोन्ही शाळांचा प्रेरणादायी परिपाठ मांडळ गावाच्या बसस्थानक परिसरात घेण्यात आला
या परिपाठात शाळा समितीचे अध्यक्ष
श्री.गुलाबबाबा कोळी व श्री.स्वप्निल पाटील अध्यक्ष तसेच   शाळासमिती सदस्य  पालक नागरिक महिला पालक उपस्थित होते.
या प्रसंगी शाळेतील विदयार्थी यांनी प्रभावी परिपाठाचे सादरीकरण केले
या परिपाठाच्या माध्यमातून विदयार्थी उपस्थिती वाढवावी पालकांना शिक्षणाची जाणीव जागरुकता निर्माण व्हावी जि.प.शाळेविषयी आदरभाव वाढवावा यासाठी छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे.

या कार्यक्रमात देशभक्तिर गीत आमच्या शाळेतील जेष्ठ शिक्षक नानासो विकास पाटील व विदयार्थी यांनी प्रभावी गायन केले
या गीताच्या माध्यमातून मांडळ परिसरात उत्साहाचे वातावरण   निर्माण झाले.अमळनेर तालुक्यातील मांडळ गाव सर्वात जास्त विदयार्थी संख्या असणारे गाव आहे
ज्या विदयार्थी मुळे आपल्या जि प शाळाचालू आहेत त्या प्लाट परिसरात जाऊन शालेय वातावरण व विदयार्थी संख्या वाढविण्याचा प्रयत्न आहे
उपक्रमशिल आनंदायी शनिवार उपक्रम सादर केलाआहे यावेळी उपस्थित पालकांनी कौतुक केले
याप्रसंगी दोन्ही  शाळांचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक बंधू भगीनी उपस्थित होते
अशाप्रकारे आनंद दायी शनिवारची सांगता झाली.