अमळनेर : विनाकारण शिवीगाळ करू नको हे सांगण्याचा राग आल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत एकाने दोघांवर ब्लेड ने वार केल्याची घटना १ रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली.
सौरभ संजय मुंदाणकर व संजय सुधाकर मुंदाणकर हे दोघे १ रोजी दुपारी १२ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीत उभे असताना विजय नामदेव पाटील रा ढेकू रोड हा आला आणि शिविगाळ करू लागला. संजय याने त्याला सांगितले की याठिकाणी महिला आहेत तू शिवीगाळ करू नको. याचा त्याला राग आला आणि त्याने खिश्यातील ब्लेडने हातावर ,कानावर ,पाठीवर ब्लेडने वार केले. संजय चा मुलगा सौरभ भांडण आवरायला गेला असता विजय ने त्यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या काखेवर , चेहऱ्यावर ,उजव्या मांडीवर ब्लेडने वार केले. दोघांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सौरभ याने दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता ११८(१),११५ ,३५१(२),३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत.