मागील वर्षी खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे पूर्ण वाया गेल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ४४ कोटी ३८ लाखांच्या मदतीला शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध झाला असल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी दिली. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक मदत अमळनेर तालुक्याला मिळाली आहे.
याबाबत महाराष्ट्र शासन व महसूल व वन विभागाचे आदेश 18 व 25 फेब्रुवारी रोजी प्राप्त झाले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला होता, विशेषत: कापसाच्या पिकाला मोठा फटका बसला होता. याशिवाय इतर पिकेही बाधित झाली होती,परतीच्या पावसामुळे कापूस काढणीवर असतानाही शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास हिरावला गेला होता. तालुक्यातील ५३०६४ शेतकऱ्यांची ३२५६९.७८ हेक्टर शेतजमीन प्रभावित झाली होती. यासंदर्भात तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी त्वरित पंचनाम्याचे आदेश देऊन मदतीसाठी शासन दरबारी योग्य तो पाठपुरावा केल्याने अवघ्या सहाच महिन्यात या शेतकऱ्यांना एकूण ४४ कोटी ३८ लाख ५९ हजार रुपयांची भरपाई मिळणार आहे. तर संपूर्ण जिल्ह्यात देखील बाधित शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार आहे.
या गावांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत-
हेडावे, सुंदरपट्टी, रढावण, राजोरे, पळासदडे, सारबेटे खु., सारबेटा बु, ढेकु खु., ढेकु बु., एकरुखी, जूनोने, रामेश्वर खु, रामेश्वर बु, व्यवहारदळे, सोनखेडी, गडखांब, पिळोदा, कचरे, मांजर्डी, खेडी खु प्रअ, नगाव खु, कुहें खु, कुर्ह सीम, कुर्हे बु, नगाव बु, लोणे, कंडारी खु, निमझरी, दहिवद, दहिवद खु, म्हसले, टाकरखेडा, देवळी, देवगाव, झाडी, जैतपीर, मांडळ, मुडी प्र डा, वावडे, लोण बु, लोण खु, लोणचारम, लोणसीम, तळवाडे, गलवाडे बु, गलवाडे खु, ढेकुचारम, आंबासन, ढेकुसीम, भरवस, लोणपंचम, सबगव्हाण, अंतुर्ली, रंजाणे, प्र.डांगरी, करणखेडा, अंबारे, खापरखेडा प्र डा, कळमसरे, पाडळसे, बोहरे, चौबारी, वासरे, खेडी बु प्र डा, खर्दे, भोरटेक, अटाळे, पिंपळे खु, वाघोदा, पिंपळे बू, चिमनपुरी, फापोरे बु, फापोरे खु, शिरुड, आर्डी, शिरसाळे खु, आनोरे, शिरसाळे बु, चाकवे, रनाइचे बु, मुडी प्र डा, वावडे, तळवाडे, गलवाडे बु, गलवाडे खु, ढेकुचारम, अंबासन, ढेकूसीम, भरवस, पाडसे, एकलहरे, एकतास, ब्राम्हणे, भिलाली, कळंबू, बोदर्ड, नीम, तांदळी, शहापूर, मारवड