अमळनेर: गांधीनगर अतिक्रमण बाबत मध्यस्थी वरिष्ठ न्यायालयाचा अहवाल येत नाही तोवर ‛जैसे थे’ परिस्थितीची ची मुदत वाढवण्यात आली आहे
गांधीनगर येथील अतिक्रमण संपूर्णपणे काढण्यात आले असले तरी अतिक्रमण धारक न्यायालयात गेले असून पर्यायी घरे मिळावीत , म्हाडा मध्ये घरे न देता याचठिकाणी किंवा गावातच घरे मिळावीत अशा प्रकारची मागणी रहिवाश्यानी केली आहे. न्यायालयाने १३ पर्यंत जैसे थे चे आदेश दिले होते. पालिकेने अतिक्रमण काढण्यात आले असून कायद्याने आता काहीच करता येणार नाही अशा आशयाचा खुलासा केला. दरम्यान या प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी वरिष्ठ न्यायालयाकडे प्रकरण सोपवण्यात आले आहे. तिकडून निर्देश येईपर्यंत जैसे थे ची मुदत वाढवून मिळण्याची विनंती करण्यात आली. त्यावर न्यायालयाने मध्यस्थी न्यायालयच्या सूचना येत नाही तोपर्यंत जैसे थे च ठेवण्याचा निर्णय दिला आहे.