लोक न्यूज

अमळनेर- महाराष्ट्र सरकारने प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्ती बनवण्यावर घातलेली बंदी उठवण्याची ठाम मागणी अमळनेरचे आमदार तथा माजी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी विधी मंडळाच्या सभागृहात मांडली.
     अमळनेर विधानसभा मतदारसंघातील मूर्तिकार संघटनेच्या सदस्यांनी काही दिवसांपूर्वी आमदार पाटील यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे पीओपी मूर्तीनिर्मितीवरील बंदीमुळे होणाऱ्या अडचणीं निदर्शनास आणून दिल्या होत्या.या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर आमदार अनिल पाटील यांनी सरकारकडे या निर्णयावर पुनर्विचार करून मूर्तिकारांना दिलासा देण्याची मागणी केली. बंदीमुळे मूर्तिकारांचे रोजगार धोक्यात आल्याने त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली आहे.
      दरम्यान आ. अनिल पाटील यांनी यापूर्वीच मूर्तिकार संघटनांना त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगानेच त्यांनी काल सभागृहात ठाम भूमिका घेत, सरकारने यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.