लोक न्यूज

तालुक्यातील पिंपळे खुर्द येथे भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत असते, त्यावर तोडगा म्हणून लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील यांनी धार येथील खाजगी विहिरीवरून टँकर भरून आणून दररोज गावातील नागरिकांना पाणी पुरवठा केला, यात आर्थिक व शारीरिक परिश्रम जास्त असल्यामुळे सरपंच वर्षा पाटील यांनी पिंपळे येथील पाणी टंचाई वर कायमची मात करण्यासाठी गावशेजारील तलावाचे खोलीकरनाचे काम हाती घेतले आहे.गाळ साचलेला असल्याने तलावाचे पुनर्भरण होत नसल्यामुळे त्याचे खोलीकरण करून गाळ काढून तलावात पाणी सचल्यास पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांना मागणी केली असता त्यांनी माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद कडून ३० लाख रुपये खर्चाची पाझर तलाव दुरुस्ती व पुनर बांधणीची योजना मंजूर करून ११ रोजी दुपारी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन केले, या तलाव दुरुस्ती तुन पाणी साठवण क्षमता वाढून भुजल पातळीत वाढ होणार असून त्यातून कोरड्या झालेल्या विहिरी ही जिवंत होऊन गावाला पाणी पुरवठा करणारी विहिरीत जलसाठा होईल व गावातील पाणी टंचाईवर मात करता येईल.
    तलाव दुरुस्ती तुन पांच गावातील विहिरीतील जलसाठा वाढून टंचाई दूर होईल यात चिमणपुरी, पिंपळे खुर्द, पिंपळे, वाघोदे, खडके आदी गावात पिण्याच्या पाण्याची समस्या उन्हाळ्यात भेडसावंत असते त्यासाठी पाझर तलावाची दुरुस्ती झाल्यास वरील पांच ही गावातील पाणी टंचाई दूर होऊन टँकर मुक्त गावे होऊन कोरड्या विहिरीत पाणी येऊन भुजल पातळी वाढेल तसेच तलावातील गाळ काढून तो शेतकऱ्यांना शेतीत टाकल्यास उत्पादन वाढून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल त्यातून गाळ मुक्त धरण व गाळ युक्त शेती अभियान ही साध्य होणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांनी सांगितले.
    पिंपळे खुर्द येथे झालेल्या भूमिपूजन प्रसंगी पिपळे खुर्द, बुद्रुक, वाघोदे, खडके, चिमणपुरी  पांच ही गावातील ग्रामस्थ लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील, ठेकेदार अनिल साठे, तंटामुक्त अध्यक्ष निंबा चौधरी, योगिता दिनेश पाटील, माजी सरपंच दिनेश प्रेमराज पाटील, पिंपळे बु चे सरपंच अपेक्षा राहुल पाटील, सामाजिक कार्यकर्ते  युवराज पाटील, डॉक्टर विलास पाटील जयवंत पाटील,गोकुळ पाटील, पुरुषोत्तम चौधरी,नारायण पाटील, पंडित पाटील सतीश दुला पाटील,आधार पाटील,कमलेश पाटील, हरीलाल पाटील,आदी ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.