लोक न्यूज
अमळनेर :  अवैद्य रित्या दारू वाहतूक करणाऱ्या रिक्षावर छापा टाकून पोलिसांनी दारू व रिक्षासह  एक लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना मंगळग्रह मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ घडली.
   परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांना अमळनेर शहरातून पॅजो रिक्षा मध्ये अवैद्य दारूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.त्यामाहितीच्या आधारावर  पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर,पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, पोलीस कॉन्स्टेबल विनोद सदांनशिव,प्रशांत पाटील,उज्ज्वल म्हस्के,निलेश मोरे आदींचे पथकाने चोपडा रस्त्यावरील मंगळग्रह मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ  रिक्षावर छापा टाकला.रिक्षा चालक धनराज अशोक चौधरी वय ४६ रा.अमळगाव ता.अमळनेर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून २३ हजार ४० रुपयांची मॅक्डोल व्हिस्की १४४ कॉटर,१८ हजार २४० रुपयांची रॉयल स्टॅग ९५ कॉटर,७ हजार ६८० रुपयांची इम्पेरीयल ब्लु ४८ कॉटर,९ हजार १२० रुपयांची रॉयल चॅलेंज ४८ कॉटर व ७० हजार रुपयांची  रिक्षा असा १ लाख  २८ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर माल प्रवीण काशिनाथ चौधरी रा.अमळगाव ता.अमळनेर यांचा असल्याने त्याच्या वर व गाडी चालकांवर पोलीस कॉन्स्टेबल उज्ज्वल म्हस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसांत मुंबई दारूबंदी अधिनियम ६५ अ,६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.