अमळनेर येथे आदिवासी ठाकूर समाजाच्या शिमगा उत्सवाला यंदा महिलांनी होळी पेटवून मोठ्या उत्सवात सुरवात केली.
टाऊन हॉल येथील मैदानात पारंपारिक पद्धतीने ठाकूर समाजातर्फे होळी साजरी केली जात असताना यंदा ठाकूर समाजातील महिलांनी होळी उभारून होळी पेटवण्याची प्रथा नव्याने सुरू करून बदलत्या काळानुसार उत्सवाला पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. महिला प्रमुख मिनाताई महाले, सचिव शैलजा शिंदे, कोषाध्यक्ष अपेक्षा पवार, उपाध्यक्ष रेखा ठाकूर, बेबीबाई वानखेडे,सल्लागार जयश्री वाघ, हिराबाई ठाकूर, हर्षदा वाघ,आशा ठाकूर,स्वाती ठाकूर, अश्विनी ठाकूर,मनिषा सूर्यवंशी शितल ठाकूर, हेमलता ठाकूर,सुमन ठाकूर, मंगल ठाकूर, दुर्गाबाई ठाकूर,विजया सैदाने रुपाली ठाकूर, दिपाली ठाकूर, कोकीळा बाई ठाकूर,भाग्यश्री ठाकूर, स्वप्ना ठाकूर ,पूनम ठाकूर,शारदा ठाकूर,मीराबाई ठाकूर, छायाबाई ठाकूर,उज्वला ठाकूर यांचेसह मोठ्या संख्येने उपस्थित महिलांनी होळीची खना,नारळाची ओटी वाहून हारडा ,कंगन हार अर्पण करीत होळीला अग्नी देत शिमगा उत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या होळीला सुरुवात केली.
होळी पेटविण्यापूर्वी आदिवासी ठाकूर समाज महिला मंडळांतील महिला कार्यकर्त्यानी उंबर झाडाची फांदी होळी खड्ड्यात पुरुषांकडून उभी करून घेत स्वतः खोल खड्यातील होळीच्या पायाशी गवरी ठेवून होळी रचायला सुरुवात केली. ठाकूर समाजात होळीसाठी ओले लाकडांना तोडता सामूहिक वर्गणीतून गोळा केलेली कोरडी लाकडं रचून होळी उभी करण्याची प्रथा यंदाही जोपासण्यात आली. होळीला झेंडू फुले, पुष्पहार , रंगबिरंगी फुगे,पताका लावून महिलांनी होळी सजविली होती. सजवलेल्या ओळीची सर्वांनी पूजन करून दर्शनहि घेतले.समाज बांधव व भगिनींनी होळीच्या अग्नीभोवती "एकच चाले आदिवासी चाले" अश्या आदिवासी गाण्यांवर उत्साही वातावरणात फेर धरला.होळीचा प्रसाद म्हणून उपस्थिताना गुळाची जिलेबी आदिवासी ठाकूर समाज महिला मंडळाच्यावतीने उपस्थित त्यांना वाटप करण्यात आली.
परंपरेनुसार जमातीचे प्रमुख दिलीप ठाकूर, राज्याचे सरचिटणीस अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे,प्रकाश वाघ ,संजय ठाकूर,अनिल ठाकूर,यशवंत सूर्यवंशी ,धनराज ठाकूर , चंद्रशेखर ठाकूर, रविंद्र वानखेडे,प्रकाश वानखेडे,आदिं प्रमुख पदाधिकारी यांनी होळीला पुष्पहार अर्पण करून "होळी रे होळी पुरणाची पोळीच्या गजरात होळीला नवैद्य अर्पण करीत पूजन केले. यावेळी दिलीप वानखेडे,जितेंद्र ठाकूर,विजय ठाकूर,वामन ठाकूर,अरुण चव्हाण, कमलाकर ठाकूर , उमाकांत ठाकूर , राजेंद्र ठाकूर , ज्ञानेश्वर ठाकूर , सुरेश ठाकूर ,हेमंत ठाकूर,जेष्ठ कार्यकर्ते लिलाधर ठाकूर,सुकदेव ठाकूर, काशिनाथ ठाकूर, गजानन ठाकूर,भैय्या ठाकूर, कुणाल ठाकूर युवा कार्यकर्ते दिपक ठाकूर, प्रविण ठाकूर,दिपक वानखेडे, गणेश ठाकूर ,संजय सूर्यवंशी, मुकेश ठाकुर,उमेश ठाकूर,मनोज ठाकूर,सुरेश ठाकूर ,विवेक सूर्यवंशी आदिंसह ठाकूर समाजाचे नागरिक अबाल वृद्ध तरुण तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदिवासी ठाकुरांमध्ये पाच दिवसीय होळीचा उत्सव ठाकूरांच्या होळी ,धुलीवंदन ते रंगपंचमीपर्यंत अमळनेरात साजरा होत असतो.
लोक न्यूज