अमळनेर : गावरान जागल्या सेनेने केलेल्या तक्रारीची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वांधा कमिटीने दखल घेऊन शेतकऱ्यांचे तोलाई ,वराई आणि शेतमालाच्या वाहतूक खर्च परत करण्याचे आदेश दिले आहेत.
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांचा माल मोजल्यानंतर तो माल संबंधित व्यापाऱ्याच्या बाजार समिती बाहेरील गोदाम अथवा शेड पर्यंत माल नेण्यासाठी शेतकऱ्याला सक्ती केली जात होती. त्यामुळे शेतकऱ्याला माल बाजार समिती पर्यंत आणणे आणि परत व्यापाऱ्याच्या गोदामपर्यंत नेणे असा खर्च करावा लागत होता. त्यावर गावरान जागल्या सेनेने हरकत घेतली होती व शेतकऱ्यांना वाहतूक खर्च प्रति क्विंटल ४० रुपये परत करण्याची मागणी केली होती. त्याचप्रमाणे लिलावाच्या ठिकाणी माल मोजताना शेतकऱ्यांकडून फी घेतली जात होती पुन्हा तोल काट्यावर शेतकऱ्याकडूनच फी घेतली जात होती. ती तोल काट्याची ५० रुपये फी परत करावी आणि वराई १२७ रुपये देखील घेऊ नये अशी मागणी केली होती. या सर्व मुद्द्यांवर गावरान जागल्या सेनेचे अध्यक्ष प्रा विश्वासराव पाटील तसेच रमेश पाटील , बाजार समितीच्या वांधा कमिटीचे अध्यक्ष उपसभापती सुरेश पाटील , संचालक प्रा सुभाष पाटील ,सचिन पाटील , डॉ अनिल शिंदे , नितीन पाटील , व्यापारी संचालक प्रकाश वाणी , डॉ अशोक पाटील सचिव डॉ उन्मेष राठोड , सुनील सोनवणे यांची संयुक्त बैठक झाली. त्यात रमेश पाटील यांनी मागितलेला वाहतूक खर्च , तोलाई व वाराई परत करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच यापुढे शेतकऱ्यांनी माल मोजताना मापाई दिली असेल तर वजन काट्यावर पुन्हा माल मोजल्यास तोलाई शेतकऱ्यांकडून न घेता ती व्यापाऱ्याकडून घेण्यात यावी असेही बैठकीत ठरले. त्याचप्रमाणे यापुढे शेतकऱ्यांचा माल बाजारसमिती बाहेर नेण्यास शेतकऱ्यांची संमती घ्यावी.
शेतकऱ्यांनी त्यांची तक्रार असेल तर माल मोजण्यापूर्वी बाजार समितीकडे करावी - डॉ उन्मेष राठोड ,सचिव ,कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर
मापाई दिलेल्या शेतकऱ्यांनी तोल काट्यावर तोलाई देऊ नये ती व्यापारीनी द्यावी असे जनजागृतीपर फलक ठिकठिकाणी लावण्यात येतील- अशोक पाटील ,सभापती बाजार समिती अमळनेर