लोक न्यूज
अमळनेर : न्यायालयात बहिणीला उलट सुलट प्रश्न का विचारले म्हणून वकिलाला बहीण भावांनी न्यायालयाच्या आवारातच मारहाण करून खांदा फ्रक्चर केल्याची घटना ४ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास  अमळनेर न्यायालयाच्या आवारात घडली.
      ऍड प्रशांत रमेश बडगुजर रा विद्यानगर धुळे रोड अमळनेर यांच्याकडे २०१५ पासून वादी रवींद्र पुरुषोत्तम पवार रा दहिवद यांच्यातर्फे पुरुषोत्तम सोनू पवार ,  राजेंद्र पुरुषोत्तम पवार , वैशाली राजेंद्र पवार , सुमनबाई पुरुषोत्तम पवार , मीनाक्षी कैलास  भामरे , प्रियंका निशांत पाटील  या प्रतिवादींविरुद्ध न्या एलमाणे यांच्या न्यायालयात वाटणीचा खटला सुरू आहे. ४ रोजी दुपारी मीनाक्षी कैलास भामरे रा कवठळ ता जि धुळे यांची उलट तपासणी घेतली. ते आटोपल्यावर वकील प्रशांत बडगुजर न्यायालयाच्या बाहेर ओट्यावर उभे असताना राजेंद्र  पवार त्याठिकाणी आला व माझी बहिण मीनाक्षी हिला उलट सुलट प्रश्न का विचारले म्हणून विचारू लागला. वकिलाने त्याला मी वादी चा वकील आहे असे सांगताच त्याला राग येऊन त्याने तोंडावर खांद्यावर मारहाण सुरू केली व खांदा फ्रँकचर केला. तर मीनाक्षी हिने खाली पडून चपलेने मारहाण केली. राजेंद्र पवार याने वकिलाच्या गळ्यातील १० ग्राम सोन्याची चेन बळजबरीने ओढून त्याच्या मित्रकडे दिली व तो मित्र तेथून निघून गेला. तसेच न्यायालयीन कामकाजासाठी घातलेला बॅन तोडून नुकसान केले. जाताना दोघा बहीण भावानी तू कोर्टाच्या बाहेर निघ तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. प्रशांत बडगुजर यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून भारतीय न्यायासंहिता कलम ३०९(४),११८(१), ३५१(२),३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत.