अमळनेर: पालिकेने पाणीपट्टी करावर २ टक्के व्याज आणि लोकवर्गणीच्या माध्यमातून होणारी लूट थांबवावी अशी मागणी माजी आमदार शिरीषदादा चौधरी मित्रपरिवाराने करून गांधीगिरी करत जनावरांना कापण्याच्या प्रतिकात्मक सुरा मुख्याधिकारीना भेट दिला.
नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांकडून पाणीपट्टीवर दोन टक्के व्याज वसूल केले जात असल्याने तसेच लोकवर्गणी चा माध्यमातूनही लूट करीत असल्याने या विरोधात मागील वर्षी देखील माजी आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीने आंदोलन केली होती. त्यावेळेस 2%व्याज वसुली तूर्त स्थगित केले होते. परंतु पुन्हा नगरपरिषदेने दोन टक्के व्याज वसुली सुरू केल्याने नागरिकांची मोठी लूट नगरपरिषद करीत असल्याचा आरोप मित्रपरिवार आघाडीने केला आहे, जिल्ह्यातील कुठल्याही नगरपालिकेला अशी वसुली नसताना फक्त अमळनेर नगर परिषदेत वसुली केली जात असल्याचा त्यांचा आरोप आहे.त्याचप्रमाणे अनेक वर्षापासून लोकवर्गणीच्या नावाने छुपा कर लावून नागरिकांची लूट सुरू आहे त्या विरोधात शिरिषदादा मित्रपरिवार आघाडीच्या वतीने गांधीगिरी करत जनावरांना कापण्याच्या प्रतिकात्मक सुरा भेट देत,निवेदन देऊन तात्काळ लोकवर्गणी व दोन टक्के व्याज वसुली बंद करावी अन्यथा मित्र परिवार आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.यावर मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी लवकरात लवकर याबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी गटनेते प्रवीण पाठक, प्रतोद सलीम टोपी,माजी नगरसेवक गुलाब पाटील, भाऊसाहेब महाजन, धनंजय महाजन, अनिल महाजन,संतोष लोहेरे ,दीपक चौगुले, पंकज चौधरी,शुभम यादव, राहुल कंजर, कुणाल साळी, नावेद शेख, किरण बागुल नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.