लोक न्यूज
अमळनेर : आमच्या घरासमोरून का जातो या कारणावरून भांडण करत तिघानी एका तरुण ,त्याची बहीण व आईला मारहाण करून बहिणीचा विनयभंग तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना २४ नोव्हेंबर २०२४  रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एलआयसी कॉलनीत घडली.
      पीडित तरुणीने फिर्याद दिली की २४ नोव्हेंबर रोजी तिचा भाऊ जात असताना एलआयसी कॉलनीतील योगेश बोरसे व प्रणव बोरसे यांनी त्याला अडवून तू आमच्या घरासमोरून का जातो म्हणून शिवीगाळ आणि मारहाण करीत होते. त्यावेळी तरुणीची आई भांडण सोडवायला गेली असता योगेश वसंत बोरसे व प्रणव बोरसे यांनी त्याच्या आईला केस ओढून सिमेंटच्या रस्त्यावर खाली पाडले त्यामुळे महिला गंभीर जखमी झाली. त्याचवेळी चंद्रकांत बोरसे तेथे आला व त्याने तरुणीचा हात ओढून अश्लील वर्तन केले. तरुणीच्या आईला दुखापत झाल्याने तिला ग्रामीण रुग्णालय तेथून नर्मदा फौंडेशन व नन्तर धुळे येथील ओम क्रिटिकल मध्ये दाखल केले होते. महिला बेशुद्धावस्थेत दोन महिने दवाखान्यात असल्याने तरुणीने पोलिसात फिर्याद दिली नव्हती. तरुणीच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला  योगेश ,प्रणव व चंद्रकांत तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४ ,११५ ,११७ , ३५१(२),३५२ , अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(१)(र)(एस), ३(२)(व्ही ए) , ३ (१)(डब्ल्यू)(१)(२) प्रमाणे मारहाण ,विनयभंग , ऍ ट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास डीवायएसपी विनायक कोते करीत आहेत.