लोक न्यूज
अमळनेर : पोलिसांनी छापा टाकत  तालुक्यातील बहदरवाडी येथील बोरी नदीतून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टर वर कारवाई केली असून तिन्ही ट्रॅक्टर व वाळू सह ९ लाख १८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
    परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले यांनी अमळनेर पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारताच अवैध व्यवसायांवर नियंत्रण मिळवले. मात्र  शहरासह तालुक्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीचे प्रमाण वाढलेले आहे आणि  त्यावर कारवाई होत नसल्याची तक्रार  परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांना प्राप्त झाली.  पोलीस अधीक्षक  महेश्वर रेड्डी साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक  कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक  कोते  यांच्या  मार्गदर्शनाने  3 मार्च  रोजी पोलीस उपनिरीक्षक  नामदेव बोरकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, पोलीस कॉन्स्टेबल विनोद संदानशिव, उज्वल मस्के, निलेश मोरे, प्रशांत पाटील यांच्या पथकाने बोरी नदीच्या काठावरील  बहादरवाडी फाट्याजवळ सापळा रचून रात्री ११  वाजेच्या सुमारास  ट्रॅक्टर क्रमांक इमेच  १९ ए एन  ४४६० वरील चालक रवींद्र बुवाजी भिल  वय 30 वर्ष राहणार रुबजी नगर , ट्रॅक्टर क्रमांक एम एच १९ बी जी  ७०२९  वरील चालक अर्जुन शिवा पवार वय २६ वर्ष राहणार हिंगोणा तालुका अमळनेर , विना नंबर प्लेट चे लाल रंगाचे ट्रॅक्टर निळ्या रंगाची ट्रॉली असलेले त्यावरील चालक किशोर शांताराम पाटील वय २६ वर्ष राहणार हिंगोणा तालुका अमळनेर यांचे  ट्रॅक्टर वाळूने भरलेल्या ट्रॉली  पोलिसांनी ताब्यात घेऊन अंमळनेर पोलीस स्टेशनला जमा केले. वाळू सह तिन्ही ट्रॅक्टरची किंमत ९ लाख १८ हजार रुपये आहे. कॉन्स्टेबल उज्वल म्हस्के यांच्या फिर्यादीवरून तिन्ही  आरोपी  विरुद्ध भारतीय न्याय संहीता कलम 303(2) सह जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48(7)48(8) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.  आरोपी यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता  त्यांना न्यायालयाने  एक दिवस पोलीस सुनावली  आहे. तपास   पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर  करीत आहेत.

अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध वाळू वाहतुकीसह इतर अवैध धंदे करणारे व करण्यास भाग पाडणारे मूळ मालकांच्या शोध घेऊन कठोर कारवाई केली जाईल -  प्रभारी अधिकारी  केदार  बारबोले ,परिविक्षाधीन डीवायएसपी