अमलनेर:येथील महिला उद्योगपती प्रतिभा विजय पाटील यांना महिला दिनानिमित्त दिल्ली येथे लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने गौरविण्यात आले.
८ मार्च २०२५ रोजी 'डायरेक्ट सेलिंग विमेन्स इंटरप्रेन्यूरशिप समिट - २०२५' चे आयोजन केडीएस यादव टेडियम येथे करण्यात आले. या समारंभात १२,००० पेक्षा अधिक महिला उद्यमींना त्यांच्या उत्तुंग कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणात महिलांच्या संघर्ष, मेहनत आणि त्यांच्या यशाला सार्वजनिकपणे मान्यता देण्यात आली
समारंभात दिल्लीचे खासदार प्रवीण खंडेलवाल, उत्तराखंडचे मुख्यमंत्री श्री पुष्कर सिंह धामी, भारत सरकारच्या माजी मंत्री स्मृती इराणी, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि एडीएसईआयचे अध्यक्ष डॉ. संजीव कुमार यांसारख्या प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
उद्योगपती प्रतिभा विजय पाटील यांना त्यांच्या जीवनभराच्या योगदानासाठी 'लाइफटाइम अचिव्हमेंट' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महिलांना व्यवसायिक मार्गदर्शन देण्यास आणि महिला उद्यमित्वाला चालना देण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महिलांच्या आर्थिक सशक्तिकरणावर आणि महिलांच्या शक्तीवर जोर दिला. महिलांसाठी समान संधी मिळविणे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण हे आवश्यक असल्याचे प्रतिभा पाटील यांनी सांगितले.
या समारंभाचा उद्देश महिलांना सशक्त बनविणे आणि त्यांना त्यांच्या व्यावसायिक स्वप्नांचा पाठिंबा देणे होता. महिलांच्या सामर्थ्याला वाव देणाऱ्या आणि त्यांच्या यशाला महत्व देणाऱ्या अशा कार्यक्रमाने समाजात महिलांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले आहे.