प्रशांत कोरटकरने (नागपूर) इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन कॉल करून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज व माँसाहेब जिजाऊ यांच्या बद्दल हिणकस व गलिच्छ वक्तव्य करून बदनामी केल्याने व याबाबत सखल बहुजन समाजाच्या मागणी नंतरही अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत नसल्याने ९ मार्च रोजी अमळनेरात भव्य मोर्चा काढण्याचा सखल बहुजन समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी पदाधिकारीनी बोलताना सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज तमाम बहुजन समाजाचे श्रद्धास्थान, प्रेरणास्थान असल्याने शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत, शिवधर्माचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल दुष्ट शब्द उच्चारून शिवधर्मी यांच्या व बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने बुद्धी पुरस्कर व दृष्ट उद्देशाने प्रशांत कोरटकर ने कृती केलेली आहे. धार्मिक श्रद्धांचा अपमान केला आहे.समाजकंटक प्रशांत कोरटकर वर गुन्हा दाखल करण्यासाठी मोर्चाचे आयोजन करावे म्हणून बहुजन समाजातील सर्व प्रतिष्ठित व्यक्तींची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यात एकमताने त्यात कोरटकर वर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय झाला. यासाठी अमळनेर पोलीस स्टेशनला सकल बहुजन समाजाचे सुमारे ५० प्रतिष्ठित व्यक्ती गुन्हा दाखल करण्यासाठी गेले परंतु वरिष्ठ पोलीस निरीक्षक केदार बारबोले यांनी गुन्हा दाखल करण्यास असमर्थता व्यक्त केली. गुन्हा दाखल करत नाही हे सहकारण आम्हास लेखी द्या, अशी मागणी केल्यावर त्यांनी लेखी देण्यास नकार दिला. प्रशांत कोरटकरने केलेले कृत्य हे गुन्हा दाखल करण्यासाठी पुरेसे असून, भारतीय न्याय संहितेच्या अनेक कलमा खाली गुन्हा नोंद होऊ शकतो, असे असताना एखादा पोलीस अधिकारी गुन्हा दाखल करण्यासाठी नकार कसा देऊ शकतो? हे कृत्य भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेल्या हक्कांना नाकारणारे आहे. हा संविधानाच्या मूल्यांचा भंग आहे. आणि ही प्रशासनाची हुकूमशाही सदृश्य कृती आहे असा आरोप जयवंतराव पाटील, प्रा अशोक पवार,विक्रांत पाटील,प्रशांत निकम व ऍड दिनेश पाटील यांनी आपल्या भावनेतून व्यक्त केला. पोलीस स्टेशनच्या बाहेर शांततेने आम्ही शांततेने बसलो. डी वाय एस पी नी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क केला असता त्यांनी निरोप दिला की गुन्हा दाखल करायला आलेल्या लोकांना माझ्याकडे पाठवा. मा. पोलीस अधीक्षकांकडे चर्चेसाठी बोलविले आहे असे लेखी पत्र आम्हाला द्या अशी मागणी केल्यावर पोलीस प्रशासनाने लेखी देण्यास नकार दिला. सकल बहुजन समाजाच्या शिष्टमंडळात तीन सीनियर वकील होते विविध राजकीय पक्षांचे अध्यक्ष व राज्य पातळीवरील पदाधिकारी होते आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्तेही होते असेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यामुळेच प्रशांत कोरटकर या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी अमळनेर तालुक्यातील सकल बहुजन समाजाच्या नागरिक स्त्री पुरुषांनी रविवार दि ९ मार्च रोजी सकाळी मा उपविभागीय अधिकारी अंमळनेर भाग यांचे कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे सदर मोर्चा हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून, मोर्चाला सुरुवात होऊन मोर्चा मंगलमूर्ती चौक, कचेरी रोडने प्रांत कार्यालयावर दाखल होईल. होणाऱ्या परिणामांची सर्व जबाबदारी अमळनेर पोलीस प्रशासनाची राहील. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिक बंधू भगिनींनी मोर्चात सहभागी होण्यासाठी रविवार दिनांक ९ मार्च रोजी सकाळी ९:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहातील पुतळ्याजवळ हजारो च्या संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती, सकल बहुजन समाजातर्फे करण्यात आली. मोर्चा कोणत्याही पक्षाचा नाही व कोणत्याही पक्षा विरुद्ध नाही.व ९ तारखेच्या आधी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यास मोर्चा स्थगित केला जाईल असेही अमळनेर तालुका सकल बहुजन समाजाने स्पष्ट केले आहे.यावेळी
प्रा सुभाष पाटील,कैलास पाटील,डी एम पाटील,डी के पाटील,अजिंक्य चिखलोदकर,दीपक काटे,अशोक पाटील आदी उपस्थित होते.