अमळनेर:- तालुक्यातील जळोद येथील तापी नदीच्या पात्रात अनवर्दे येथील इसमाचा मृतदेह वाहून आल्याचे ६ रोजी आढळून आले.
जळोद येथील पोलिस पाटील भारती पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ६ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास तापी नदीच्या पात्रात धोबीघाटाच्या काठालगत अनोळखी इसमाने प्रेत वाहून आल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहिले असता अंदाजे ३५ ते ४० वयाच्या पुरुषाचे प्रेत तरंगत असल्याचे दिसून आले. प्रेताच्या अंगावर गुलाबी रंगाचा शर्ट व काळया रंगाची पँट असून इसम बारीक अंगकाठीचा असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यानंतर सदर प्रेत चोपडा तालुक्यातील अनवर्दे येथील लखीचंद रावा शिरसाठ यांचे असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ सुनील जाधव करीत आहेत.