अमळनेर – शहरातील कुंटे रोडवरील अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या फळ विक्रेत्यांच्या दोन गटात व्यवसायावरून हाणामारी झाल्याची घटना १५ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता घडली. एकावर चाकूने हल्ला तर दुसऱ्याला लोखंडी वजनाने नाकावर वार करण्यात आला.
शाहिद रहीम बागवान (वय १८) रा. अब्बासिया मस्जिद जवळ बाहेपुरा अमळनेर याने फिर्याद दिली की तो कुंटे रोडवर धर्मा प्रोव्हीजन जवळ केळी विक्रीचा व्यवसाय करतो. त्याचा व्यवसाय चांगला चालत असल्याने त्याच्या शेजारी असणाऱ्या फळ विक्रेत्यांनी त्याला दमबाजी केली. १५ मार्च रोजी संध्याकाळी ५.३० वाजता रईस राजू बागवान रा. शाहआलनगर हा दिवसभर भोंगा लावून टरबूज विक्री करत होता. त्याच्या ओरडण्याने त्रास होत होता म्हणून शाहिद याने त्याला ओरडू नको असे सांगितले. त्याचा राग आल्याने रईस राजू बागवान , राजू बुढण बागवान व अनिस हनिफ बागवान यांनी शाहिद बागवान याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर शाहरूख हनीफ बागवान याने लोखंडी टरबूज कापण्याच्या चाकूने त्याच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शाहिदने तो वार हाताने अडवल्याचा प्रयत्न केल्याने चाकूचा वार कपाळावर लागला. त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. घटनेनंतर जखमी शाहिदला तातडीने नर्मदा फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पोलिसांनी शाहिद बागवानच्या तक्रारीवरून रईस बागवान, राजू बागवान, अनिस हनीफ बागवान आणि शाहरूख हनीफ बागवान या चौघांविरोधात याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११५, ३५१ (२), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत.
तर राजू रईस बागवान याने फिर्याद दिली की मी माईकवर टरबूज विक्री चा व्यवसाय करीत असताना तेथील गोलू उर्फ शाकीब बागवान याने हातातील माईक फेकून दिला. त्याचा जाब विचारला असता तेथील रहीम छोटू बागवान , रहीम छोटू बागवान , गोलू उर्फ शाकीब या तिघांनी शिवीगाळ व लाथा बुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. त्या दरम्यान काल्या उर्फ शाहिद रहीम बागवान याने तराजू काट्यातील वजन उचलून जोरात नाकावर मारले त्यामुळे नाकातून रक्त येऊ लागले. त्याला सुयश ऍक्सीडेंट हॉस्पिटल मध्ये दाखल केले. उपचार घेतल्यानन्तर अमळनेर पोलीस स्टेशनला रहीम बागवान ,रहीस बागवान, काल्या उर्फ शाहिद आणि गोलू उर्फ शाकीब यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११७ ,११५ , ३५२ ,३ ,५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.