लोक न्यूज
अमळनेर :  येथील  गांधलीपुरा भागातील वेश्या व्यवसाय बंद करण्यासाठी शहरातील  सर्व धर्मीय सर्वपक्षीयांचा प्रांत कचेरीवर   मूक मोर्चा काढण्यात आला
    अमळनेर येथील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पासून दुपारी अडीच वाजता या मूक मोर्चाला सुरुवात झाली.सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले व पवित्र कुराण पठण  करून मोर्चा निघाला.
    रियाज शेख , बन्सीलाल भागवत , संदीप घोरपडे, सोमचंद संदानशिव,  यशवंत बैसाणे, अरविंद बिऱ्हाडे,  बाळासाहेब शिंदे, एडवोकेट अभिजीत बिऱ्हाडे ,मनोज मोरे, काँग्रेसचे मनोज पाटील , पाचोर्‍याचे  अझर खान, एकता संघटनेचे फारुक शेख  यांनी सुद्धा आप आपले मनोगत व्यक्त केले.  कोणत्याही परिस्थितीत हा कुंटणखाना नागरी वस्तीतून स्थलांतर होणे आवश्यक आहे, या वस्तीमध्ये देह व्यापार करणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, काही राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांचा या व्यवसायास प्रत्यक्ष पाठिंबा असल्याचे त्यांच्या विरोधात सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. उपविभागीय दंडाधिकारी नितीन मुंडावरे व सहाय्यक पोलीस अधीक्षक केदार बारबोले यांनी मोर्चेकऱ्यांचे  निवेदन स्वीकारले.

त्यावेळी फारुक शेख
मोर्चाचे समन्वयक रियाज शेख, कुदरत अली सय्यद,  शेर खान पठाण, आबीद अली सय्यद, आकिब अली सय्यद, अल्तमस शेख, मोईज अली,  राजू शेख, अनिस शहा, ताहेर शेख, अल्ताफ शेख, अब्दुल रऊफ टेलर,  गौरव साळुंखे आप्पा पारधी, प्रभाकर पारधी प्रताप दगडू , रामदास रूपला, रमेश घोलप ,नीतीश लोहरे, अनिल चंडाले, फिरोज मिस्तरी , मुक्तार खाटीक, इमरान खाटीक, अब्दुल गफार खाटीक ,  आरिफ तेली, शाहरुख सिंगर, मोहसीन जडीबुटी, अकरम शेख, रफिक शेख, कलीम , अख्तर अली सय्यद, राहील पठाण, मोहसीन शेख, हैदर मिस्तरी, फिरोज पैलवान, सलमान शेख, जावेद शेख, रवी शेख, राजू काजी, अल्ताफ राजा, शरीफ शेख, सईद , रिजवान मणियार, अजहर सय्यद आदि हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.