अमळनेर : तालुक्यातील पिंगळवाडे येथील जिल्हापरिषद शाळेच्या चार विद्यार्थ्यांना स्काऊट अंतर्गत कब चा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
राज्य भारत स्काऊट-गाईड कार्यालयातर्फे जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्हयातून आलेल्या स्काऊटच्या कब-बुलबुल पथकांचे तीन दिवसीय निवासी राज्यस्तरीय चाचणी शिबिराचे आयोजन हस्ती भवन दोंडाईचा (जि.धुळे) येथे दिनांक 25 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले होते. राज्यस्तरीय चतुर्थचरण चाचणी (कब) व हिरकपंख (बुलबुल) शिबीरात जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून तब्बल 89 कब (मुले) व 57 बुलबुल (मुली) एकूण 146 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
पिंगळवाडे येथील जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील शिक्षक तथा कब मास्टर दत्तात्रय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने कब राज्यस्तर चतुर्थ चाचणी पुरस्कार शिबीरासाठी नोंदणी केलेले शाळेतील इ.3 री 4 थी तील विद्यार्थी गिरीष किशोर चव्हाण (3 री), हर्ष समाधान पाटील (4 थी), राजवीर संजय पाटील (4 थी) व सम्राट भूषण कोळी (4 थी) हे 4 विद्यार्थी दोंडाईचा येथील राज्यस्तर चाचणी शिबीरात सहभागी झाले होते. तीन दिवसीय निवासी शिबीरात चारही विद्यार्थी लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक कार्यात यशस्वी सहभाग नोंदवून राज्यस्तरावर अव्वल स्थान प्राप्त करत पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
कब विभागात जळगाव जिल्ह्यातील एकमेव जिल्हा परिषदेची शाळा म्हणून मुलांना नियमितपणे राज्य पुरस्कार चाचणी परीक्षेसाठी सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी करुन घेतल्याबद्दल कबमास्टर दत्तात्रय सोनवणे यांचेसह तिसरीतील गुणी विद्यार्थी गिरीष किशोर चव्हाण याच्या लेखी-तोंडी परीक्षेतील विशेष प्राविण्याबद्दल शिबीर प्रमुख जीवन मटके (ठाणे) यांनी गौरवोद्वार काढले.
स्काऊट-गाईड विभागाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत , डायट चे प्राचार्य अनिल झोपे, स्काऊट जिल्हा मुख्य आयुक्त तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, जिल्हा सचिव सरला पाटील, जिल्हा सहसचिव डी.एस.सोनवणे, गाईडच्या जिल्हा संघटक हेमा वानखेडे यांचे मार्गदर्शन मिळाले. शिबीर प्रमुख जीवन मटके, संगीता रामटेके, जिल्हा स्काऊट-गाईड संघटक सुधाकर साखरे (नंदुरबार), जयवंता असोले (धुळे), हेमा वानखेडे (जळगाव), नरेश सावंत (दोंडाईचा) कबमास्टर दत्तात्रय सोनवणे (जळगाव), संदीप पाटील (नंदुरबार), जितेंद्र आव्हाड (धुळे), फ्लॉकलिडर सिमा पाटील (जळगाव), ललिता भामरे (नंदुरबार) यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर यशस्वी झाले. याकामी कबमास्टर दत्तात्रय सोनवणे यांना शाळेतील सहकारी शिक्षक वंदना ठेंग (मुख्याध्यापिका), प्रविण पाटील , रविंद्र पाटील व वंदना सोनवणे यांचे सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अमळनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, केंद्रप्रमुख चंद्रकांत साळुंके, सरपंच मंगलाताई देशमुख, उपसरपंच समाधान पारधी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविंद्र देशमुख, उपाध्यक्ष मिना भिल व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ पिंगळवाडे यांनी अभिनंदन केले आहे.