पावसाळा सुरू होण्यापूर्वी पाडळसे धरणाचे काम जलद गतीने होऊन कोणत्याही परिस्थितीत शासनाचा प्राप्त निधी पूर्ण खर्च करावा असे पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्यावतीने निम्न तापी प्रकल्पाशी संबंधित उप अभियंता व संबंधित अधिकाऱ्यांना निम्न तापी प्रकल्प पाडळसरे येथे धरणाच्या कामाची पाहणी करीत असतांना आवाहन करण्यात आले.
पाडळसरे धरणासाठी प्राप्त निधी पूर्णतः पाडळसळे धरणावरच खर्च झाले पाहिजे यासाठी पाडळसरे धरण जन आंदोलन समिती आग्रही असून पाडळसरे धरणासाठी येणाऱ्या काळात निधी मोठ्या प्रमाणावर मिळावा तसेच अवर्षणग्रस्त पट्ट्यात असलेल्या या धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश तातडीने व्हावा म्हणून समिती आंदोलनाच्या तयारीत असल्याचेही यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना समितीचे प्रमुख सुभाष चौधरी,रणजित शिंदे,महेश पाटील,रविंद्र पाटील, सुनिल पाटील, अजयसिंग पाटील डॉ.संजय पवार यांनी सांगितले.
याप्रसंगी निम्न तापी प्रकल्पाचे उपाभियंता हितेश भटूरकर यांनी निम्न तापी प्रकल्पात सुरू असलेल्या पुनर्वसन, धरणाचे बांधकाम, उपसा सिंचन योजनेचे काम,मातीकाम याकामांच्या विविध तांत्रिक बाबींची माहिती देताना प्राप्त निधी जुलै अखेरपर्यंत खर्च करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे व धरणाच्या प्रत्यक्ष कामावर सदर निधीच्या वितरणाबाबतचे नियोजनाबाबत सविस्तर माहिती उपस्थित धरण समितीचे प्रमुख पदाधिकारी तसेच प्रशांत भदाणे, सौ वसुंधरा लांडगे, एम डी पाटील, रामराव पवार, भरतसिंग परदेशी, डी के पाटील, सुशील भोईटे, प्रसाद चौधरी,दशरथ लांडगे आदींना दिली. याप्रसंगी प्रत्यक्ष बांधकाम स्थळी जाऊन सुरू असलेल्या कामाची व भविष्यात करणार असणाऱ्या कामाची व नियोजनाची माहिती संबंधित अधिकारी उपअभियंता हितेश भटूरकर व अभियंता पगारे यांनी जागेवर दिली.
लोक न्यूज