लोक न्यूज
अमळनेर : नवरदेवाच्या आईच्या  पर्स मधून सुनेचे सुमारे सव्वा दोन लाखाचे दागिने लंपास झाल्याची घटना २ रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास बन्सीलाल पॅलेस मध्ये घडली.
     तांबेपुरा येथील हनुमान मंदिराजवळील रहिवासी प्रल्हाद भावसार व लता भावसार यांच्या तुषार नावाच्या मुलाचे लग्न २ मार्च रोजी बन्सीलाल पॅलेस मध्ये होते. लता भावसार यांनी त्यांच्या सुनेसाठी १ लाख ८६ हजार ७६४ रुपयांचे २३.६८० ग्राम सोन्याची पोत आणि ३३ हजार ९१४ रुपयांचे ४.३०० ग्राम पेंडल हे पर्स मध्ये ठेवले होते. नातेवाईक जेष्ठ महिलांचे पाय पडण्यासाठी लता भावसार पर्स हॉल मध्ये बाजूला ठेवून गेल्या. तिकडून परत आल्यावर त्यांना पर्स उघडी दिसली. पर्स मधील  २ लाख २० हजार ६७८ रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. लता भावसार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.